Distance Mode P.G. Courses Admission Started : Last Date
M.A. :Marathi / Hindi / English / Urdu / History / Political Science / Public Administration / Sociology / Economics
M.Com.
संजीवनी महाविद्यालय चापोली येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राच्या अभ्यासक्रमास प्रवेश देणे सुरू…
🔷राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० मधील व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व ओळखुन कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक फायदा राज्यातील युवकांना व्हावा यासाठी राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र चे ऑनलाईन उद्घाटन दी. २० सप्टेंबर २०२४ रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथुन करण्यात आले होते.
🔷 महाविद्यालयाने दाखवलेली इच्छुकता आणि जिल्हा कार्यालयाकडुन आपल्या शिक्षण संस्थेच्या शिफारसी नुसार संजीवनी महाविद्यालयाची हे केंद्र चालविण्यासाठी निवड करण्यात आली होती.
🔷 या केंद्राचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये प्रदान करणे आणि त्यांना उद्योगक्षेत्रात सक्षम करणे आहे. या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ज्यामुळे ते स्वावलंबी आणि रोजगारक्षम होतील.
🔷या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयात कृषीविषयक डेरी फार्मर आणि कॉम्पुटर विभागामध्ये वेब डीजायनिंग यांची प्रत्येकी ३० विद्यार्थांची एक तुकडीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना तांत्रिक, व्यावसायिक आणि उद्योजकीय कौशल्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. केंद्रामध्ये संबंधित विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार असुन ते विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आणि स्वतःचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन करतील. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
▶️ महत्वाचे म्हणजे प्रवेश घेण्यासाठी पात्रता हि फक्त ११ पास हीच असल्याने त्यापुढील कुठल्याही वयोगटातील युवक यात प्रवेश घेऊ शकतात फक्त त्यांची कुठेही सध्यस्थितीत ऍडमिशन नसावी.
▶️ मोजक्याच जागा असल्याने आजच प्रवेश निश्चित करा…..
प्रवेशासाठी संपर्क:-
9423854916/9503202355/9860705150/9326021212
आदेशनावये
प्राचार्य ,
संजीवनी महाविद्यालय, चापोली , ता. चाकुर जी. लातुर (४१३५१३)